कृषीक्रांती ऍग्रोव्हेट मध्ये आपले स्वागत आहे

कृषीक्रांती ऍग्रोव्हेट प्रा. लि. हि प्राण्यांचे आरोग्य जपण्यासाठी वेगवेगळ्या आवश्यक उत्पादनांची आणि पशुखाद्याची निर्मिती करणारी कंपनी आहे.शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या या कंपनीची स्थापना २३ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आली आहे. कृषी क्रांती शेतकऱ्यांना वाजवी दरात पशुखाद्य आणि पशूंच्या आरोग्यासाठी आवश्यक उत्पादनांची पूर्तता करते.पशूंचे आरोग्य जपून दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी क्रांतीने उत्पादने बनवली आहेत. कृषी क्रांती पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसून ती पशुपालन व्यवसायाच्या वाढीशी संबंधित आहे.

about-us

वाढीच्या विविध टप्यांमध्ये प्राण्यांचे आरोग्य जपणाऱ्या व दूध उत्पादनात भरघोस वाढ करणाऱ्या उच्च गुणवत्तेच्या आणि पौष्टीक पशुखाद्याची आणि उत्पदनांची पूर्तता करणे.

मिशन

व्हिजन

शेतकऱ्यांना वाजवी दरात उत्तम दर्जाची उत्पादने आणि सेवा देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व पशूंच्या आरोग्यासंबंधित समस्यांवर अचूक उत्पादनांची पूर्तता करून पशुखाद्य उद्योगामध्ये अव्वल स्थान मिळवणे.

कृषीक्रांती ऍग्रोव्हेटमध्ये, आमचा पाया मूलभूत मूल्यांच्या संचावर बांधला गेला आहे जे आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन करतो.

मूळ मूल्ये

about

सचोटी

उत्पादनाच्या निर्मितीमध्ये प्रामाणिकपणा आणि विक्रीमध्ये पारदर्शकता हे शेतकरी, भागीदार आणि समुदायांसोबतचे आमचे परस्परसंवाद परिभाषित करतात.

about

दर्जेदार उत्कृष्टता

आम्ही पशुधनासाठी आरोग्य आणि उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी उच्च दर्जाचे पशुखाद्य वितरीत करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

about

शेतकरी-केंद्रित दृष्टीकोन

शेतकरी हे आमच्या ध्येयाचे केंद्रस्थान आहे. त्यांच्या यशासाठी आणि कल्याणासाठी आम्ही अथक परिश्रम करतो.

about

नावीन्य

कृषी उद्योगाच्या विकसनशील गरजा पूर्ण करणारे प्रगत फीड सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी आम्ही नावीन्यपूर्ण गोष्टी स्वीकारतो.